loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेतील वैश्य युवक मंडळाचा 40 वा वर्धापन दिन संपन्न ---

देवळे (वार्ताहर)- संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील वैश्य युवक मंडळ बाजारपेठ मुंबई रजिस्टर चा 40 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात माजी शिक्षक व कालेश्वरी देवस्थान कमिटीचे सचिव दीपक गोपाळ गुरव यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक राजेंद्र मावळणकर गुरुजी यांचाही सत्कार करण्यात आला. चाफवली शाळा नंबर 1 ची विद्यार्थिनी समीक्षा बोडेकर हीची इस्रो आणि नासा भेटीसाठी निवड झाल्याने ती इस्रो भेटीला गेल्यामुळे तिचा सत्कार शिक्षक गजानन मोघे गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच देवळे हायस्कूलमधील दहावी मध्ये पहिले तीन येणार्‍या विद्यार्थ्यांचाही यावेळी बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत, बापू शेट्ये यांनी शुभेच्छा भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पत्रकार प्रकाश चाळके आपले विचार व्यक्त करताना म्हणाले आज दोन भाऊ एका ठिकाणी राहताना दिसत नाहीत. मात्र हे मंडळ सर्व सदस्याना घेउन गेली 40 वर्षे गुण्या गोविंदाने नांदत असून 50 वा वर्धापन दिन ही मोठ्या उत्साहात साजरा करतील असा विश्वास आहे. या मंडळाच्या इवल्याशा बिजाचा वटवृक्ष झालेला पाहताना आनंद होत आहे. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष विजय परशेटे, सचिव संजय काळोखे, शरद साडविलकर गजानन काळोखे, बंटी काळोखे, गजानन मोघे, दीपक गुरव, राजेंद्र माळकर, निलेश कोळवणकर, रेश्मा परशेटे इत्यादी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg