loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा पोलिसांकडून बेपत्ता युवतीचा शोध, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

म्हसळा - रायगड : म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गवाडी येथील शर्मिला अनंत जाधव वय २२ वर्षे ही युवती दिनांक १५ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली असून त्यानंतर ती अद्यापपर्यंत परत आलेली नाही. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक ०८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता युवतीचे वर्णन रंग गोरा असून बांधा सडपातळ आहे. उंची अंदाजे १५८ सेंटीमीटर आहे. कानात सोन्यासारखे दिसणारे झुमके आहेत. दोन्ही हातांवर फुलाच्या आकाराचे गोंदण असून कपाळावर टिकलीसारखे गोंदण केलेले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित युवतीला बोलता येत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर युवती कोठेही दिसून आल्यास अथवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ म्हसळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस नाईक एस.ए.विघ्ने बक्कळ नं. २३८० मोबाईल नंबर ९४२०७८६८२० किंवा म्हसळा पोलीस ठाणे ०२१४९-२३२२४० या क्रमांकावर करावा. बेपत्ता युवतीचा शोध घेण्यासाठी म्हसळा पोलीस तपास करीत असून नागरिकांनी माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg