loader
Breaking News
Breaking News
Foto

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांची जयंती साजरी

रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक ८ जून २०२६ रोजी कोकण कृषी विद्यापीठाचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत (८ जून १९०८ - ११ मे १९९२) यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकणातील शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले कार्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी, मत्स्यव्यवसाय, बागायती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव रत्नागिरीचे डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, डॉ. मनोज घुघुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) तसेच अपूर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), महेश किल्लेकर, मनिष शिंदे, सचिन पावसकर, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, प्रविण गायकवाड, भूमि भाटकर, पेडणेकर, स्वप्नील आलीम, प्रशांत पिलणकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

डॉ. बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे माजी कार्यवाह मुख्यमंत्री तसेच कोकणातील कृषी, शिक्षण व ग्रामीण विकासासाठी कार्य करणारे दूरदृष्टीचे नेते होते. ते केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रयत्नांतून १८ मे १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांच्या निधनानंतर १२ फेब्रुवारी २००१ रोजी विद्यापीठाचे नामकरण 'डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ' असे करण्यात आले. या संशोधन केंद्रांच्या तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंतांनी पाहिलेले 'सुजलाम सुफलाम कोकण'चे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आजही सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg