loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे नाका येथे मच्छीचा ट्रक पलटी; कारला वाचवताना अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे मुंबईहून केरळच्या दिशेने मच्छी घेऊन जाणारा ट्रक (क्र. KA 20 D 6955) पलटी होऊन अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून केरळच्या दिशेने जाणारा मच्छीचा ट्रक भरणे नाका परिसरातून जात असताना त्याच्या समोर अचानक एक कार आली. कारला धडक बसू नये म्हणून चालकाने ट्रकवरील नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात ट्रक डिव्हायडरवर चढून महामार्गावरच पलटी झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे कर्मचारी संपत गीते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या तसेच ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक काही वेळातच पूर्ववत करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg