loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पूर्व विभागात ‘लव्ह जिहाद’ने संतापाचा भडका

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील शिपोशी येथील हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने लव जिहादच्या माध्यमातून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत शिपोशी पंचक्रोशीसह लांजा तालुक्यातील शेकडो हिंदू बांधवांनी मंगळवारी दुपारी लांजा पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन सादर करताना या लव जिहाद प्रकरणामध्ये संबंधित मुस्लिम तरुणाला मदत करणार्‍या लांजा येथील स्थानिक हिंदू तरुण तसेच अन्य व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर देखील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदू बांधवांनी या निवेदनाद्वारे केली. मंगळवारी सकाळी लांजा तालुक्यातील विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू बांधव यांनी लांजा तहसील कार्यालय येथे एकत्र येत जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर या हिंदू बांधवांनी लांजा पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्याशी चर्चा केली. आमची मुलगी पालकांच्या ताब्यात द्या तसेच लव जिहादच्या माध्यमातून झालेल्या लग्नाचे सर्टिफिकेटची आपण शहानिशा केलीत का? संबंधित अधिकार्‍याने मुलीचा दिलेल्या रिपोर्ट हा चुकीचा आहे. त्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई का केला नाहीत? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी हिंदू बांधवांनी करताना या मुलीच्या जीवाला धोका आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे तिला पालकांच्या ताब्यात द्या किंवा तुमच्या ताब्यात ठेवा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी हिंदू बांधवांची बाजू ऐकून घेऊन योग्य ती कायदेशीर बाजू तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर आणि लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, शिपोशी येथील मुलीला असलम लांजेकर (रा. शिपोशी ता. लांजा) यांचा भाचा शाहनवाज बशीर सारंग याने रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी पळवून नेले. त्याची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. शाहनवाज सारंग हा मुस्लिम धर्मीय असून त्याने लव जिहादच्या माध्यमातून मुलीच्या विरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून, तिला व्हिडिओ दाखवून, ब्लॅकमेलिंग करत अनेक प्रलोभने दाखवून तिला वारंवार फोन करून तिच्या पालकांविषयी व हिंदू धर्माविषयी तिच्या मनात विष कालवून तिला भ्रमिष्ट केले आहे. तिच्यावर त्याचा प्रचंड दबाव असल्यामुळे की सध्या दबावाखाली बोलत आहे.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण देशात व राज्यात घडत असलेल्या लव जिहादच्या घटनांचा विचार करता ही घटना देखील त्याचप्रमाणे आहे. त्यामुळे भविष्यात संबंधित मुलीच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे. या घटनेमुळे हिंदू धर्मीयांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू मुलींमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेमुळे हिंदू धर्मामध्ये निर्माण झालेला असंतोष पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदर मुलीला तात्काळ तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणात संबंधित मुलाला मदत करणारे मंगेश उर्फ पप्पू मुळे (रा. लांजा) तसेच अभिषेक कुमार पांडे (रा. अलाहाबाद), मिथुन कुमार (रा. उत्तर प्रदेश) आणि श्रावणी संतोष मांडवकर (रा. मुंबई) या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे हिंदू बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg