loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक ऑफ इंडिया आणि द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात विमा सेवा करार

खेड: बँक ऑफ इंडिया आणि द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात राष्ट्रीय पातळीवर जनरल इन्शुरन्स विमा अंतर्गत एक महत्त्वपूर्ण टाय-अप झाला आहे. या करारामुळे आता बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांना आणि कर्जखातेदार यांना ’द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी’मार्फत सवलतीच्या दरात विविध विमा पॉलिसींचा लाभ घेता येणार आहे. या भागीदारी अंतर्गत बँकेच्या ग्राहकांना विविध विमा पॉलिसी या मधे प्रामुख्याने मेडिक्लेम, वाहन विमा, घराचा विमा (होम इन्शुरन्स - बंगलो, फ्लॅट इत्यादी), दुकान आणि फॅक्टरी विमा यांसारख्या विविध जनरल विमा पॉलिसी सेवांचा लाभ घेता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नवीन सुविधेचा प्रचार करण्यासाठी नुकतीच एक विशेष प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटी (प्रसिद्धी कार्यक्रम) आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला ’द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड’ खेड शाखेचे शाखा अधिकारी श्रेयश मोरे, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विश्वेश मयेकर, तसेच द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचे बिझनेस असोसिएट हनिफ घणसार व अधिकारी आशिष ढवण, आणि विमा प्रतिनिधी फरीद चौगुले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी बँकेच्या ग्राहकांना ’मेडिक्लेम’ (आरोग्य विमा) संदर्भातील माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच बिझनेस असोसिएट हनिफ घणसार यांच्या वतीने ग्राहकांना इतर विविध पॉलिसींची सविस्तर माहिती देण्यात आली. बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांनी द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या या विविध विमा पॉलिसींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी न्यू इंडिया ईन्शुरन्स चे श्रेयस मोर व बँक ऑफ इंडिया चे मयेकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg