राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि इंडिया आघाडीची आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णयात आवश्यक दुरुस्ती करावी, असा सल्ला दिला. त्याचवेळी इंडिया आघाडीच्या बैठकीला पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिल्लीमध्ये आज होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या मते, ही कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयासाठी बोलावलेली बैठक नसून "जनरल रिव्ह्यू मीटिंग" आहे. आघाडीतील कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये, असा संदेश या बैठकीत दिला जाण्याची शक्यता आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.