loader
Breaking News
Breaking News
Foto

पालगड किल्ल्यावर शिवध्वज पूजन, सौरपथदीपांचे उद्घाटन, महाराजा प्रतिष्ठान - महाराष्ट्र राज्य अभ्यास मोहीम

खेड : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ला पालगड येथे गडकिल्ले संवर्धन-ध्यास गडकोटांचा महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने अभ्यास मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान शिवरायांच्या जयघोषाने शनिवारी, पालगड किल्ला परिसर दुमदुमला. शिवध्वजारोहणाचा मान नगरसेविका वैभवी खेडेकर यांना देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले व वनश्री ताई गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवध्वज पूजन संस्थेचे मार्गदर्शक अमर काते, पूनमताई काते यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्याते शैलेश निकम यांनी मार्गदर्शन केले. याचवेळी पालगड किल्ल्यासाठी सोलर पथदीपांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नियोजन संस्थेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. अभिजीत गांधी, प्रणव मापुस्कर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांकडे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराजा प्रतिष्ठान संस्थेच्या मार्फत शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पालगड किल्ल्यासाठी सोलर स्टील लाईट अनावरण करण्यात आला. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले, मुख्य सल्लागार निखिल जामसंडेकर, मार्गदर्शक उत्तम कुमार जैन, सदस्य अमर काते, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अभिजीत गांधी, मार्गदर्शक विलास शेळके, स्वराज गांधी, शिर्के, उमेश भोसले, पालगड संवर्धन प्रमुख अजिंक्य कदम आधी जण उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg