loader
Breaking News
Breaking News
Foto

६ जून शिवराज्याभिषेक दिनी आमदार प्रमोद जठार देणार गोपाळगडला भेट

वेळणेश्वर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्यभिषेक दिनी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर उपस्थित राहून छत्रपतींना मानवंदना करणार आहेत. मालकी हक्काच्या वादामुळे गेली अनेक वर्ष चर्चेत राहिलेला गोपाळगड मालकी हक्कावरून वादातीत असणारा हा गोपाळगड मालकी हक्कातून मुक्त व्हावा याकरता स्थानिक ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, वृत्तपत्रे, शिवप्रेमी संस्था, सर्व राजकीय व्यक्तिमत्व आपापल्या परीने प्रयत्न करीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी तातडीचे आदेश देऊन पुढील १५ दिवसात किल्ल्याबाबतची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या कामाला अधिक गती मिळावी, छत्रपतींच्या साम्राज्यातील गोपाळगड मालकीच्या वादातून मुक्त श्वास घेण्यासाठी सज्ज व्हावा, आजपर्यंत अनेकांनी केलेल्या श्रमाचे चीज व्हावे याकरता विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, ज्यांनी या किल्ल्याकरता प्रारंभी अथक प्रयत्न केले होते. असे भाजपाचे नेते वैभव खेडेकर, पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg