loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदा दारू बाळगल्या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांची कारवाई, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर पोलिसांनी बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्याविरोधात कारवाई करत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वर बाजारपेठ परिसरात केलेल्या तपासणीदरम्यान संशयिताकडून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी प्रमोद उर्फ गणेश जगन्नाथ सुर्वे (रा. संगमेश्वर परिसर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे १४० लिटर क्षमतेच्या गावठी दारूच्या कॅनसह एकूण १७ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही कारवाई संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पो, नि, राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. संगमेश्वर पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून बेकायदा दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत असुन संगमेश्वर वाशीय संगमेश्वर पोलिसांचे अभिनंदन करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg