loader
Breaking News
Breaking News
Foto

सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसले नॉलेज सिटी, चराठे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच प्रवेश प्रक्रियेशी संबंधित घटकांना CAP प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या CAP प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, कागदपत्र पडताळणी, पर्याय भरणे, गुणवत्ता यादी, प्रवेश फेऱ्या तसेच विविध तांत्रिक बाबींविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने राज्यातील विविध विभागांमध्ये सुसंवाद कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी व पालकांना अधिकृत, अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सीईटी सेलचे अधिकारी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी व पालकांना थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg