loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-दापोली मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधकांना पांढरे मार्किंग, नगरसेवक निकेतन पाटणे यांच्या पुढाकारातून रस्ते सुरक्षेला चालना

खेड : (प्रतिनिधी) - खेड- दापोली मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सुधारित आणि रुंद रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढत असल्याने काही भागांमध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकांची वाहनचालकांना वेळेत जाणीव व्हावी आणि संभाव्य अपघात टाळता यावेत यासाठी गतिरोधकांवर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारून त्यांचे स्पष्ट मार्किंग करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड-दापोली मार्ग हा तालुक्यातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्यामुळे काही संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत होती. त्यानुसार काम पूर्ण झालेल्या भागांतील अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये गतिरोधक टाकण्यात आले. मात्र अनेक वेळा गतिरोधक स्पष्टपणे दिसत नसल्याने, विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात, वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अचानक ब्रेक लावण्याच्या घटना घडत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे नगरसेवक तथा खेड नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे यांनी पुढाकार घेत गतिरोधकांवर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारण्याचा उपक्रम राबवला.

टाइम्स स्पेशल

या मार्किंगमुळे वाहनचालकांना दूरवरूनच गतिरोधकांची कल्पना येणार असून वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे रस्ते सुरक्षेला बळ मिळणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या कामाचे स्वागत केले असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg