loader
Breaking News
Breaking News
Foto

आपण कोकण विधान परिषदेसाठी निश्चितच इच्छुक होतो : राजन साळवी

अकोला : राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीदरम्यान कोकण मतदारसंघाची मोठी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेल्या या जागेवर शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता. या मतदारसंघातून राजापूरचे माजी आमदार राजन साळवी इच्छुक होते. मात्र, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अकोला येथे माध्यमांशी बोलताना माजी आमदार राजन साळवी म्हणाले की, आपण कोकण विधान परिषदेसाठी निश्चितच इच्छुक होतो. मात्र, पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे कोणतीही नाराजी नसून आपण पक्षासाठी जोमाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भविष्यात एकनाथ शिंदे आपल्या कामाचा नक्कीच सन्मान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच कोकण विधान परिषदेसाठी पक्षाने आणि आपण केलेल्या त्यागाची भरपाई भविष्यात महाराष्ट्रात निश्चितच होईल, असेही माजी आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg