loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळेतील रस्त्यांची दुरवस्था; दुरुस्ती न झाल्यास ८ जूनला उपोषणाचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - नेमळे गावातील वाडीतून गेलेले ग्रामीण रस्ते तळवडे, मळगाव, कमळेवीर वेंगुर्ला, झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्ग या सर्व मुख्य रस्त्याना जोडण्यात आले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामपंचायतकडे जाणारा मुख्य रस्ता, ग्रामपंचायत ते दलित वस्तीपर्यंत, पाटकरवाडी ते कमळेवीर तळवडे रस्ता या रस्त्यावरून गावातील तसेच इतर दुचाकी, चारचाकी, अवजड वाहन चालकांची सतत ये-जा चालू असते. या रस्त्यावर ठीक-ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आता थोड्याच दिवसात शाळा सुरु झाल्यावर शाळकरी मुले शाळेत जात येत असताना वाहन चालक रस्त्यावरील खड्डे चुकवीताना जीव घेणे अपघात होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी पाठ पुरावा केला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला आहे, लवकरात लवकर यां सर्व रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नेमळे ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांजकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. असे न झाल्यास ८ जून रोजी गावातील सर्व ग्रामस्थाकडून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, एकनाथ राऊळ, विक्रम पांगम, मिलिंद नेमळेकर तसेच इतर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg