खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, हरित आणि प्रदूषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात विविध प्रजातींची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनिता आवटी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी ओळखून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन हरित भविष्यासाठी सकारात्मक संदेश पोहोचेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.