loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या अकरावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

खेड, ५ जून - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या सीबीएसई अकरावी वाणिज्य शाखेची सुरूवात विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांचा वर्षाव करून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. अकरावी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यामागचा हेतू आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे ’रोटरी स्कूल हे आमचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे विश्वासाचे ज्ञानमंदिर आहे’ तसेच रोटरी स्कूलमधील विद्यार्थी विशेष प्रावीण्य संपादन करून शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपत आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत सहशालेय उपक्रमांची जोड देवून प्रत्येक क्षेत्रात आपली उल्लेखनिय कामगिरी पार पाडत आहे असे सांगितले. त्यानंतर प्रा. बाळासाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे नियम व नियमावली समजावून सांगितली. तदनंतर मार्गदर्शक शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील संगीत शिक्षक श्री. अभिषेक जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष म्युझिक थेरपी (संगीत उपचार) सत्र घेतले. संगीताच्या सुरावलींनी सुरू झालेला हा स्वागताचा सोहळा विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील अशा स्वरूपाचा ठरला. तसेच समुपदेशक प्रा. भक्ती करंबेळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीतून अकरावीमध्ये आल्यावर वेळेचे व अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी विविध फनी गेम्सचा मनमुराद आनंद लुटला. या मजेशीर खेळांमुळे विद्यार्थ्यांमधील संकोच दूर होऊन मैत्रीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेची आत्तापर्यंतची प्रगती व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आस्था चव्हाण, कु. शर्वरी सावर्डेकर, कु. यश शेट व कु. इब्राहिम दुदुके या विद्यार्थ्यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg