loader
Breaking News
Breaking News
Foto

मृत्युंजय नाटकामुळे मी मोठा झालो : ज्येष्ठ नाट्यकर्मी बाळ धुरी

सावंतवाडी - मृत्युंजय नाटकात कर्णाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी बाळ धुरी यांचा मंगळवारी सावंतवाडी येथे महेश आरोलकर यांच्या निवासस्थानी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपले मूळ गाव सरंबळ सोनावडे येथे बाळ धुरी हे आपल्या कुलदैवता व ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आले होते. त्यांची जुनी मैत्री असलेले महेश आरोलकर यांच्या घरी संध्याकाळी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाळ धुरी हे ८१ वर्षाचे आहेत. त्यांनी यापूर्वी नाट्यसृष्टी गाजवली आहे. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीवर आधारित मृत्युंजय या नाटकात त्यांनी केलेली कर्णाची भूमिका अजरामर आहे. अजूनही लोक त्यांची कर्णाची भूमिका विसरले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी थँक्यू मिस्टर ग्लाड, गुरु या नाटकातही अजरामर भूमिका केल्या आहेत. गुरु नाटकाला २७ अवॉर्ड मिळाले आहेत. नुकतेच एक वर्षांपूर्वी त्यांनी गंगा यमुना सरस्वती हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. बाळा धुरी हे व्हीजेटीआयचे टेक्स्टाईल इंजिनिअर आहेत. मात्र नाट्य क्षेत्रात एवढे मोठे नाव होऊन हि त्यांच्यातील नम्रता अजून तसीच आहे.

टाईम्स स्पेशल

मृत्युंजय नाटक तुमच्यामुळे अजरामर झाले, असे त्यांना म्हटले असता, मृत्युंजय नाटक माझ्यामुळे अजरामर झाले नसून शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरीमुळे आणि या नाटकामुळे मी मोठा झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. याप्रसंगी महेश आरोलकर, आनंद आरोलकर, श्रीपाद चोडणकर, भाई पडवळ, वेंगुर्ले, सुनील कोरगावकर, नंदू पोकळे, अन्वया विरनोडकर, अर्चना सावंत, राम वाडकर, बावतिस फर्नांडिस, मनोज घाटकर, राजू तावडे उपस्थित होते. यावेळी जुन्या नाटकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg