loader
Breaking News
Breaking News
Foto

खांदा कॉलनीत महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेकडून महावितरणची अंत्ययात्रा

पनवेल : खांदा कॉलनी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, नागरिकांना भेडसावणारा अनियमित वीजपुरवठा, तसेच अवास्तव व प्रचंड वीजबिलांच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तिरडीवर झोपवून त्याची विधिवत अंत्ययात्रा काढण्यात आली. आंदोलनादरम्यान महावितरण प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संदीप जाधव यांनी सांगितले की, खांदा कॉलनी व परिसरातील नागरिकांना सातत्याने वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे तास न तास वीजपुरवठा खंडित होत असताना दुसरीकडे नागरिकांना अवास्तव वीजबिले पाठवली जात आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असून या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, चुकीच्या व अवास्तव वीजबिलांची तपासणी करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg