loader
Breaking News
Breaking News
Foto

अ‍ॅक्वा फूड कंपनीत चोरीप्रकरणी चौघे गजाआड

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अ‍ॅक्वा फूड एक्झीम कंपनीतून लाखो रुपयांच्या यंत्रसामग्रीसह अन्य काही साहित्य चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना गजाआड केले आहे. चोरट्यांनी भावनगर-गुजरात येथील दुकानात विकलेला १५ लाख रुपये किंमतीचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला असून चारही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत ही घटना घडली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जगन्नाथ विभूती (२६, रा. तुसरा ओरिसा), दिलीप लक्ष्मण माझी (३०, चुडापाली-ओरिसा), मंगेश शंकर काळे (३८, दिघागाव-नवी मुंबई), देवरचंद साधू राणा (रा. राताखंडी-ओरिसा) अशी संशयितांची नावे आहेत. अ‍ॅक्वा फूड कंपनीत चोरीप्रकरणी चौघे गजाआड या चोरी प्रकरणात देवरचंद साधू राणा हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयितांनी चोरीत वापरलेली एमएच ०१ ईएम ९२३८ आणि एमएच ०४ एफआर १००३ क्रमांकाची दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

टाईम्स स्पेशल

चिपळूण येथील बैंक ऑफ महाराष्ट्र बँकेकडे तारण असलेले कंपनीतील चार मशिनचे स्पेअर व मशिनचे प्रेशन वाॅल्व्ह अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. डेन्मार्क देशातून हैं नटेक फ्रिजिंग सिस्टीम या कंपनीकडून विकत घेतलेले ७५० किलो वजनाचे साहित्यही चोरट्यांनी लांबवले होते. याबाबत १७ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी चोरीचा छडा लावत चारही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. चोरीतील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg