वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे मुख्याध्यापक सुधाकर शामराव कांबळे यांचा ३४ वर्षाची अखंड शैक्षणिक साधना शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक असा प्रेरणादायी प्रवास" झाला असून त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा गुहागर येथील श्रीम. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन) किर्तनवाडी रोड गुहागर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नीता मालप, सत्कार मूर्ती सुधाकर कांबळे, सुजाता कांबळे,सेवानिवृत्त शिक्षक डी. पी. गुरव, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष व उद्योजक ला.सचिन मुसळे, मयुरेश साखरकर, अँड. सुशील अवेरे, उद्योजक शामकांत खातू, तानाजी सावंत,गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, जीवनश्री प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष वरंडे, तानाजी सावंत, निलेश गोयथळे यांच्यासह गुहागर एज्युकेशन सोसायटी, जीवन श्री प्रतिष्ठान गुहागर, शिवतेज फाउंडेशन, पोलीस स्टेशन गुहागर, प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था, ज्ञान रश्मी वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, कास्टट्राईब संघटना गुहागर, माध्यमिक शिक्षक पतपेढी रत्नागिरी, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ, गुहागर नगरपंचायत, गुहागर तालुका पत्रकार संघ, श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर, रत्नागिरी जिल्हा जुदो आधी संस्थांचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी संतोष वरंडे यांनी सत्कारमूर्ती सुधाकर कांबळे यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक यामधील जीवन प्रवास कथन केला. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, नगराध्यक्ष नीता मालप त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांचे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पित सेवेमुळे त्यांनी शाळेला दिलेले मोलाचे योगदान नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहणार असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे यांनी केले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.