loader
Breaking News
Breaking News
Foto

गव्हेमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

खेड - दापोली तालुक्यातील गव्हे गावात सर्पदंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, गव्हे येथील दीप्ती जितेंद्र काजरेकर (४५) यांना शुक्रवारी पहाटेच विषारी सापाने दंश केला. दंश झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागला. कुटुंबियांनी प्ररिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र विष शरीरात वेगाने पसरल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शनिवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

टाईम्स स्पेशल

सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून सकाळी सुमारे ८.३० वाजता संबंधित सापाला सुरक्षितरीत्या पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे, दीर असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg