दाभोळ (वार्ताहर): दाभोळ-गुहागर परिसरातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी, बारावी तसेच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये आणि धार्मिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा ’झर्फ एम.एच.ओ ग्रुप दुबई’ तर्फे विशेष सत्कार करण्यात आला असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कुमार रशाद रौफमिया पालनाईक यांनी सन २०२६ मध्ये ’आलिमियत’ पदवी प्राप्त करत कुराण, हदीस, फिक्ह आणि तफसीर या विषयांत प्राविण्य मिळवले. तसेच कुमार इब्राहिम शाह बिलाल ताहीर तांबे याने बारावी परीक्षा उत्तीर्ण होत असतानाच कुराण-ए-पाकचा ’हिफ्झ’ पूर्ण केला. कुमार अफ्नान मोहम्मद आरिफ चेलकर याने नूरानी कायदा व दीनी तालीम कोर्स पूर्ण केला.
दहावी परीक्षेत कुमारी मरियम मुबारक माखजनकर (९२.६०%), कुमारी आसिया रौफमिया पलनाईक (८६.४०%), कुमारी जोहा हिदायत फडणीस (८४.४०% अंजुमन खैरुल इस्लाम शाळेत प्रथम) आणि कुमारी तयमिना आरिफ दर्वेश (८४%) व कुमारी तनजीला इम्तियाज मुल्ला (७६%) यांनी उत्कृष्ट यश मिळवले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही चांगल्या गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. बारावी व केंद्रीय शिक्षण मंडळात कुमारी सायमा बिलाल तांबे, कुमार सलीम शकील अहमद चेलकर, कुमारी सानिया अब्दुल समद फडणीस आणि कुमार अब्दुल मुकीत फैयाज मुगाये यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेत ’झर्फ एम.एच.ओ ग्रुप दुबई’ ने त्यांचा सत्कार करून पुरस्कार प्रदान केले. तरुण पिढीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा उंचावण्यासाठी ’झर्फ एम.एम.ओ ग्रुप दुबई’ करत असलेले हे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि प्रोत्साहन मिळत आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.