loader
Breaking News
Breaking News
Foto

एस. आय. ग्रुप इंडिया व सेवा सहयोग फाउंडेशनकडून जि. प. शाळा, भोके मायंगडेवाडीला दोन कपाटांची भेट

जिल्हा परिषद रत्नागिरीचा वरिष्ठ प्राथमिक गटासाठी आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६ प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भोके मांयगडेवाडीला एस. आय. ग्रुप इंडिया प्रा. लि., नवी मुंबई व सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांनी दोन कपाटे नुकतीच शैक्षणिक कामकाजाच्या वापरासाठी भेट स्वरूपात देणगी म्हणून दिली आहेत. या भेट स्वरूपातील देणगीबाबत प्रशालेत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मनीष देसाई, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना मायंगडे, सरपंच श्रीपत मायंगडे यांनी एस. आय. इंडिया ग्रुपचे व सेवा सहयोग फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष देसाई यांनी देणगी स्वरूपात मिळालेल्या दोन कपाटांमध्ये एक कार्यालयीन उपयोगाचे कपाट व एक पुस्तकांचे कपाट असून या दोन्हींची किंमत रुपये बत्तीस हजार असल्याची माहिती दिली. या दोन्ही कपाटांचा उपयोग शाळेसाठी केला जाणार असून, यामधील एक कपाट कार्यालयीन दप्तरासाठी तर दुसरे काचेचे 'बुक डिस्प्ले कबर्ड' पुस्तकांच्या साठवणुकीसाठी वापरले जाणार आहे. पुढील काही दिवसात शाळेत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी ज्ञानवर्धक व मनोरंजनात्मक पुस्तकांचे वाचनालय उपलब्ध करून देण्याचा मानस मुख्याध्यापक देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg