loader
Breaking News
Breaking News
Foto

'चांदवडी रुपया' युवा साहित्य पुरस्कार रत्नागिरीचे डॉ. अनिकेत मयेकर यांच्या 'स्टेथस्कोप'ला प्रदान!

​पुणे: ग्रामीण साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळ, चांदवड' या चळवळीच्या दशकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात रत्नागिरीचे डॉ. अनिकेत मयेकर यांच्या 'स्टेथस्कोप' या विशेष चर्चिल्या गेलेल्या साहित्यकृतीला मानाचा 'चांदवडी रुपया युवा साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'सार्वजनिक वाचनालय चांदवड' यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ३१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक वाचनालय, चांदवड येथे हा गौरव सोहळा रंगला. या सोहळ्याला चांदवड परिसरातील सर्व साहित्यप्रेमी, वाचक आणि रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.पुरस्कार ला डॉ यांचे आई वडील सुद्धा उपस्थित होते .विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, डॉ. अनिकेत मयेकर यांच्या 'स्टेथस्कोप' या पुस्तकाचा हा पहिलाच गौरव नाही. याआधी या पुस्तकाला 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड (पुणे)' चा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार, तसेच 'मराठा मंदिर साहित्य शाखा, मुंबई' चा मानाचा साहित्य पुरस्कार देखील लाभला आहे. या लागोपाठ मिळालेल्या पुरस्कारांमुळे 'स्टेथस्कोप' या साहित्यकृतीने महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.दिमाखदार सोहळा आणि पुरस्कारार्थी: या दशकमहोत्सवी सोहळ्यात डॉ. अनिकेत मयेकर यांच्यासोबतच अविनाश पोईनकर (चंद्रपूर) यांच्या 'सूरजागड : विकास की विस्थापन?' या संशोधनपर पुस्तकालाही युवा साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कवी चंद्रकांत बाबर (सांगली) यांना 'चांदवडी रुपया काव्य पुरस्कार', ज्येष्ठ पत्रकार फणिंद्र रंगनाथ मंडलिका यांना 'लक्षवेधी पुरस्कार', आणि राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे (मालेगाव) यांना 'साहित्य प्रेरणा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.ह्या वेळी प्रमुख उपस्थिती डॉ राजेंद्र मलोसे, डॉ संकलेचा, कवी राजू देसले आणि कवी देशपांडे होते.

टाइम्स स्पेशल

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे निमंत्रक सागर जाधव जोपुळकर (सचिव) व रवींद्र केदा देवरे (प्रभारी अध्यक्ष) यांच्यासह रुपया परिवारातील कवी, साहित्यिक, पत्रकार आणि चित्रकारांनी विशेष परिश्रम घेतले. एकामागून एक मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या डॉ. अनिकेत मयेकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

​'स्टेथस्कोप' पुस्तकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg