संगमेश्वर (मकरंद सुर्वे)- ५ जून- रस्त्यावरून धावणार्या निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळत दारूच्या नशेत वाहने पळवणार्या बेजबाबदार चालकांचे संगमेश्वर पोलिसांनी पुरते धाबे दणाणून सोडले आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याला स्वतःची जहागिरी समजणार्या मद्यपी चालका विरुद्ध पोलिसांनी एक अतिशय आक्रमक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. या ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईच्या मोठ्या मोहिमेत संगमेश्वर पोलिसांनी तब्बल ७ चालकांना रंगेहात पकडून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी लावलेल्या या अचूक सापळ्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील नशेडू चालक अडकले आहेत. यामध्ये कोल्हापूर येथील कसबा बावडा परिसरातील ४९ वर्षीय चालक विजयकुमार अनशा बापू उमरडे, तसेच स्थानिक असुर्डे गावातील अनिल पांडू लमाणे, माभळे गावचा ३१ वर्षीय अमोल अनंत जाधव आणि कडवई ओकटेवाडी येथील ४६ वर्षीय कृष्णा सोमा ओकटे यांचा समावेश आहे. याचसोबत राजापूर तालुक्यातील कांजीर्डा येथील महेंद्र हरिश्चंद्र पवार आणि कसबा येथील ३१ वर्षीय सैफ अली खान यांनाही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व वाहनचालकांवर वेगवेगळ्या रजिस्टर नंबरनुसार ड्रंक अँड ड्राईव्हचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची कोर्टाच्या दारात हजेरी लावण्यात आली आहे.
रस्त्यावरील वाढते अपघात रोखणे आणि वाहतूक व्यवस्थेला कडक शिस्त लावणे हाच या आक्रमक कारवाईमागचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडतात, त्यामुळे अशा कोणत्याही चालकाची यापुढे अजिबात गय केली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे. पोलिसांनी आता रात्रीच्या नाकाबंदीसह कारवाईचा वेग प्रचंड वाढवला असून, दारू पिऊन स्टिअरिंगला हात लावणार्यांची गाठ थेट पोलिसांशी आणि न्यायालयाशी असेल, हाच कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.