loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्राकडून विभा अरविंद ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यातील पेढे येथील श्री परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्राचे संचालक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विलास महाडिक यांनी त्यांच्या प्रकाशनातून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा संच विभा अरविंद ग्रंथालयाला भेट दिला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देण्यात आलेल्या या पुस्तक संचामध्ये निसर्ग, पर्यटन तसेच विविध थोर व्यक्तींच्या चरित्रांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. यतिन जाधव यांनी महाडिक यांचे स्वागत केले. ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह विजय कदम यांनी पुस्तक संचाचा स्वीकार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे संचालक प्रदीप पवार तसेच निसर्ग पर्यावरण दूत समीर कोवळे उपस्थित होते. ग्रंथालयाच्या ज्ञानसंपदेत भर घालणाऱ्या या मोलाच्या योगदानाबद्दल निसर्ग प्रकाशनचे सर्वेसर्वा विलास महाडिक यांचे उपस्थितांनी आभार मानले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमामुळे वाचनप्रेमींना निसर्ग, पर्यटन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांविषयीची दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg