loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूल प्रशालांच्या एस्. एस्. सी. विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ एस्. एस्. सी परिक्षेत प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली. सेंट्रल इंग्लिश स्कूलमधील प्रथम क्रमांक: फिदा जहिरअब्बास शेख 91.40%, द्वितीय क्रमांक: मोहम्मद साहिल इकबाल नाईक 87.60%, तृतीय क्रमांक : मिस्बा जमीरूद्दीन शहा 87.40% व फुदैल हसन आगा याने 87. 20 % गुण मिळवून चौथा क्रमांक आणि कुमार मोहम्मद झैद हानिफ मेमन याने 86 .60% गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या एकुण २० विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य आणि ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी मधील आयेशा सावकार हिने 85 .80% गुण मिळवून प्रथम, अबुझर मलिकजान धामणेकर व खदिजा अली अकबर बक्कर यांनी 78 .80% गुण मिळवून द्वितीय व इशरत मालदार 73. 80 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा मंगळवार दि. २ -०६ - २०२६ रोजी प्रशालेत संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य व माजी मुख्याध्यापक भरत गावडे, सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापूरी, उपाध्यक्षा निलोफर बेग, सचिव परवेज बेग, विश्वस्थ अलिझा खान, फरहिन खान, सोहराब बेग, अब्दुलरहीम बागवान, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सेंट्रल उर्दू स्कूलच्या शालेय समितीचे सदस्य इशान खानापुरी, सेंट्रल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक इकबाल मुलानी, केजी विभागाच्या इन्चार्ज फरीदा बागवान, पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूलचे गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याधापिका निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सहाय्यक शिक्षिका मारिया पिंटो यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी फिदा शेख, मोहम्मद साहिल नाईक, मिस्बा शहा तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूल मधील आयेशा सावकार, अबूझर धामणेकर, खदिजा बक्कर, इशरत मालदार यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक शिक्षिका स्मृती गवस यांनी पालक व शिक्षक या दोन्ही भूमिकेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे भरत गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मुख्याध्यापिका करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विदयार्थ्यांनी निर्णयक्षम बना व संयम बाळगा, असे मौलिक विचार इकबाल मुलानी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आई - वडिलांचा सन्मान करा, असा मोलाचा उपदेश निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका स्मृती गवस यांनी आभार व्यक्त केले. उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg