loader
Breaking News
Breaking News
Foto

नवे युवा पर्व सुरु, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ४२ शहरांसाठी प्रभारींची नियुक्ती जाहीर

मंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी राज्यातील विविध शहरांसाठी प्रभारी पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नवे पर्व युवा सर्व असा संदेश दिला आहे. या नियुक्त्यांमध्ये मालेगाव शहराची जबाबदारी सलग तिसऱ्यांदा शादाब सय्यद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.मालेगावचे राजकारण धार्मिक आणि पारंपारिक समीकरणांभोवती फिरत असल्याने निधर्मी विचारांच्या पक्षासाठी येथे आपले स्थान मजबूत करणे हे मोठे आव्हान मानले जाते. त्यामुळे शादाब सय्यद यांची तिसऱ्यांदा झालेली नियुक्ती विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काळात ते हे आव्हान कशा प्रकारे पेलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी राज्यातील ४२ शहरांसाठी प्रभारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये संदीप कित्ते (नागपूर), गोरख नलावडे (पुणे), प्रशांत बाबर (कोल्हापूर), सौरभ मिश्रा (भंडारा-गोंदिया), तेजस शिंदे (नवी मुंबई), निळकंठ वडमोरे (छत्रपती संभाजीनगर), प्रमोद सर्वदे (मीरा-भाईंदर), भरत सौंदाणे (नंदुरबार) आणि प्रवीण लोणकर (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

नियुक्त्यांची घोषणा करताना महबूब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये शुभेच्छा संदेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून अधिकाधिक युवकांना पक्षाशी जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.याशिवाय संबंधित जिल्ह्यांतील युवक संघटनांचा आढावा घेऊन संघटनात्मक स्थितीचा अहवाल लवकरात लवकर प्रदेश कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना नव्या प्रभारींना देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg