खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीसी परिसरातील विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ६ जून २०२६ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप चंद्रभान सिंह (वय ३३, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) हे विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये आपल्या टँकरमध्ये बसले होते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर टँकर चालकांनी आपल्या गाड्यांना सुरक्षेसाठी लाकडी ठोकला लावलेला नाही, असा व्हिडिओ तयार करून सिंह यांनी ट्रान्सपोर्ट ऑफिसला पाठवला आणि तक्रार केली, असा गैरसमज इतर चालकांनी करून घेतला. या रागातून टँकर चालक नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांनी सिंह यांना अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सिंह यांच्या शरीराला दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर ८ जून २०२६ रोजी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.