loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या बोरीवली-आडीवाडीत अंधाराचे साम्राज्य; महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक वेठीस

दापोली (सागर गोवळे) : एकीकडे पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून तयारीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे दापोली तालुक्यातील बोरीवली-आडीवाडी गावातील नागरिक मात्र गेल्या १० ते १२ तासांपासून अंधारात चाचपडत आहेत. गेल्या काही दिवसांत वीज गुल होण्याची ही तिसरी वेळ असून, पावसाळा किंवा वादळ नसतानाही महावितरणकडून विनाकारण वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावात वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांत ही तिसरी वेळ आहे जेव्हा गावाचा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. सकाळी उठल्यावर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज नसल्याने लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून, लहान मुलांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. पाऊस किंवा वादळ नसतानाही तासनतास वीज गायब असणे, हे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. "आम्ही वेळेवर वीज बिल भरतो, मग आम्हाला ही अंधाराची शिक्षा का?" असा संतप्त सवाल बोरीवली-आडीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. महावितरणने तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत न केल्यास, यापुढे ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन बोरीवली-आडीवाडी गावाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हीच मागणी जोर धरत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg