loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर - फणसवणे येथे नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाचे झाड पेटले; थोडक्यात अनर्थ टळला

मकरंद सुर्वे / संगमेश्वर : आज (शनिवारी) संध्याकाळी फणसवणे आणि परिसरावर निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर अंधाराने व्यापला गेला. त्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कानठळ्या बसवणारा आवाज आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या विजांच्या लखलखाटामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, फणसवणे परिसरातील कोचेवाडी येथे अचानक एकच खळबळ उडाली. येथील रहिवासी सिकंदर मुल्ला आणि इसाक मोडक यांच्या घराशेजारी असलेल्या उंच नारळाच्या झाडांवर प्रचंड वीज कोसळली. विजेचा जबरदस्त आघात होताच दोन्ही माडांनी क्षणार्धात पेट घेतला. आगीच्या प्रचंड ज्वाला आणि धुराचे काळेकुट्ट लोट थेट आकाशाच्या दिशेने गेल्याचे भीषण दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट होऊन एकच धावपळ उडाली. घरांच्या अगदी जवळ लागलेली आग पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. वादळी वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला आणखी भडकत होत्या आणि त्या शेजारील घरांच्या दिशेने सरकत असल्याने मोठ्या अनर्थाची भीती निर्माण झाली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg