ठाणे (प्रतिनिधी) - रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवासी तक्रारदार वंदना मनोज म्हात्रे ह्या मंगळवारी रात्री ८-३० वाजण्याच्या सुमारास खारेगाव, कळवा येथून तुळजाभवानी मंदिर, नौपाडा येथे प्रवास करताना यांच्या जवळील १५ तोळे सोने असलेली बॅग विसरल्या. म्हात्रे यांनी त्वरित नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनी तब्बल ७० ते ८० सीसीटीव्ही पुटेज खंगाळून काढीत रिक्षाचा आणि चालकाचा मागोवा काढीत तक्रारदाराची हरविलेली बॅग आणि मौल्यवान वस्तूसह सोन्याचा इलाजही परत मिळवून देण्यात यश मिळाले.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तक्रारदार वंदना मनोज म्हात्रे या खारेगाव, कळवा येथून तुळजाभवानी मंदिर, नौपाडा येथे रिक्षाने जात होत्या. प्रवासादरम्यान त्या रिक्षामध्येच आपली बॅग विसरून उतरल्या. या बॅगेत सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य होते. घाई गडबडीत गहाळ झालेली बॅग हि रिक्षात राहिल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार वंदना म्हात्रे या नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचल्या आणि तक्रार दिली. नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी तत्परतेने सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे, पोलिस हवालदार विलास देसाई, पोलिस शिपाई सारंग कांगणे आणि अनिकेत उभे याना प्रवाशी रिक्षा शोधण्याचे आदेश दिले.
पोलीस पथकाने खारेगाव नाका परिसरासह संबंधित मार्गावरील सरकारी आणि खासगी अशा तब्बल ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सीसीटीव्हीत तपासातून एमएच-०४-जे-क्यू-७८२६ क्रमांकाची रिक्षा निष्पन्न झाली. त्यानंतर रिक्षाचालक राजू साव याचा शोध घेण्यात आला. त्याच्या ताब्यातून तक्रारदारांची बॅग आणि त्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करीत तक्रारदार महिलेला परत देण्यात आले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.