loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोग्य सेवेतील ३० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास संपन्न: आश्विनी लिंगायत सेवानिवृत्त

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील रहिवाशी आणि शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका आश्विनी अनिल लिंगायत या ३० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी रुग्णसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. आश्विनी लिंगायत यांनी आपल्या ३० वर्षांच्या सेवाकाळात वाघापूर, आंबा आणि बांबवडे यांसारख्या दुर्गम भागांत अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. या काळात त्यांनी केवळ आरोग्य सेवाच दिली नाही, तर स्थानिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. त्यांच्या याच सेवाभावी वृत्तीमुळे आजही ग्रामीण भागात त्यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोरोनासारख्या कठीण काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कुटुंबापासून दूर राहून जनसामान्यांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या या धाडसी आणि समर्पित कार्याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी त्यांचा गौरवही करण्यात आला होता. आरोग्य सेवेतील रुग्णांशी कशा प्रकारे संवाद साधावा आणि त्यांना मायेने कसे हाताळावे, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कामातून घालून दिला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आरोग्य विभागातील सहकाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg