loader
Breaking News
Breaking News
Foto

​कनेडी-बांदा राज्यमार्गाच्या कामाची प्रशासनाकडून दखल; आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन

सावंतवाडी: तालुक्यातील कनेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दाणोली-बांदा या राज्यमार्ग क्र. १९० च्या दुरुस्ती, रुंदीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागण्यांची दखल घेत सकारात्मक पावले उचलली आहेत. कार्यकारी अभियंता पूजा रा. इंगवले-देसाई यांनी यासंदर्भात लेखी पत्र देऊन कामांचे नियोजन जाहीर केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या राज्यमार्गावर रुंदीकरण आणि सुधारणेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सरमळे येथील सप्तनाथ मंदिर परिसरात रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून, नदीकाठच्या बाजूला रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे रेलिंग व गॅबियन वॉलचे काम पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सरमळे पूल ते विलवडे या मार्गाची सविस्तर पाहणी करून आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, रवींद्र म्हापसेकर, उपसरपंच संतोष कासकर, सगुण गावकर, संतोष तावडे, संदीप सुकी, विनायक सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg