loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ५१ हजाराचा बेकायदेशीर गुटखा साठा जप्त

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी संशयित आरोपी अमित अशोक सावंत (वय- ४० वर्षे, रा. भरड रांगोळी महाराज मठ जवळ, ता. मालवण) याच्या विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सावंत यास न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३ जून रोजी सायंकाळी ४.२५ वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातील रांगोळी महाराज मठ नजीक असलेल्या महालक्ष्मी जनरल स्टोअर्सच्या बाजूच्या एका शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी शरीरास घातक असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा सुमारे ५१ हजार २५ रुपयांचा मोठा साठा आढळून आला. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमित अशोक सावंत (वय- ४० वर्षे, रा. भरड रांगोळी महाराज मठ जवळ, ता. मालवण) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी जीविताला धोका निर्माण करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा यांनी याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg