loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली येथील राजाराम साळुंखे यांचे वाढदिवसा दिवशीच निधन

देवळे (प्रकाश चाळके)- संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील राजाराम लक्ष्मण साळुंखे यांचे दिनांक ३१मे २०२६ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अल्पशा आजाराने निधन झाले. राजाराम साळुंखे ह े(आर.डी.सी.सी.) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कर्मचारी होते. राजाराम साळुंखे हे श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते. त्यांना परिसरात काका या नावाने ओळखायचे, काका जितके करडे तितकेच प्रेमळ, जगण्याचा व जगवण्याचा अनुभव असणारे सरोदेवाडीच्या व समाजाच्या उत्कर्षासाठी सातत्याने झटणारे, सर्वांचं लाडकं नेतृत्व पोरकं करून गेल्याची खंत समाजातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राजाराम साळुंखे यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना श्री विठ्ठल रखुमाई प्रासाधिक मंडळ सरोदेवाडी यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg