loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमधील 'कला विश्व'च्या मुलांचा डंका

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चित्रपटसृष्टीत सध्या बहुचर्चित असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या भव्य प्रीमियर सोहळ्यात चिपळूणच्या कलागुणांचा डंका पाहायला मिळाला. येथील नामांकित 'कला विश्व आर्ट स्टुडिओ'च्या गुणवान विद्यार्थ्यांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांची स्वतःच्या हाताने साकारलेली हुबेहूब आणि अप्रतिम चित्रे त्यांना थेट भेट म्हणून दिली. या विशेष सोहळ्यात विद्यार्थ्यांना केवळ कलाकारांना भेटण्याचीच नव्हे, तर त्यांच्यासोबतच बसून चित्रपट पाहण्याची आणि तो अविस्मरणीय क्षण जगण्याची सुवर्णसंधी मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलाकाराला एक हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ मिळावे आणि त्यांना त्यांच्या कलेची खरी ताकद कळावी, यासाठी 'कला विश्व'चे मुख्य संचालक सर्वेश दाभोळकर यांनी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांना तुंबाडची मंजुळा या चित्रपटाच्या टीम मधील वैभव सर व संपूर्ण टीम चे मोलाचे सहकार्य लाभले .या सर्वांच्या अथक परिश्रमांमुळेच चिपळूणसारख्या शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट एवढ्या मोठ्या चित्रपट प्रीमियर सोहळ्यात आणि नामांकित कलाकारांसमोर आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. त्यांच्या या दूरदृष्टीचे आणि प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रीमियर सोहळ्यादरम्यान चित्रपटातील नामवंत कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

कलाकारांनी स्वतः विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. हा अनपेक्षित आणि सन्मानपूर्वक अनुभव विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करणारा आणि भविष्यात कलेच्या क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे. या गौरवपूर्ण सोहळ्यात साक्षी जाधव, मानसी वासकर, निकिता वासकर, योगेश खोपकर, संजना जाधव, अनन्या भोबेकर, गायत्री बायकर, जान्हवी दाभोलकर, ईश्वरी राजे, समिधा पवार, ऋतुजा कदम आणि निधी सुर्वे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चिपळूणचे नाव उंचावले. या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांना मुख्य संचालक सर्वेश दाभोळकर यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले, तसेच त्यांना सुमित गेल्ये, प्रेम चोडणकर आणि दिपक निकाळजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 'कला विश्व'च्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सध्या संपूर्ण चिपळूण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg