loader
Breaking News
Breaking News
Foto

खालापूर तालुक्यातील ग्राम पंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

चौक, (अर्जुन कदम) खालापूर तालुक्यातील ४५!ग्राम पंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सर्व गावांत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली स्वराज्याची गुढी दिमाखात उभी करण्यात आली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशाही अवतरली असेच आजचे वातावरण निर्माण झाले होते. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा ऐतिहासिक सुवर्णदिन शिवराज्याभिषेख दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व परकीय सत्ता झुगारून रयतेचे स्वतंत्र 'हिंदवी स्वराज्य' अधिकृतपणे स्थापन केले आणि ते स्वतः 'छत्रपती' झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्याभिषेकापासून महाराजांनी राज्याभिषेक शक या नवीन कालगणनेची सुरुवात केली. हा दिवस केवळ एक सोहळा नसून, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची आणि देशभक्तीची प्रेरणा आहे.महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून अधिकृतपणे सर्व ग्राम पंचायत मध्ये साजरा करण्यात येत आहे.या दिवशी खालापूर तालुक्यातील सर्व ४५ ग्राम पंचायत कार्यालयांवर भगवे स्वराज्य ध्वज फडकवले आहेत.शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, या घोषणांनी परिसर दुमदुमला. या कार्यक्रमासाठी सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्राम पंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg