loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरमध्ये बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका; रस्ता अडवणाऱ्या दोघांवर थेट गुन्हे दाखल

संगमेश्वर (प्रतिनिधी) - शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत मनमानी पद्धतीने वाहने उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या चालकांविरुद्ध संगमेश्वर पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग करून प्रवाशांना व इतर वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी, २ जून रोजी सायंकाळच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. एसटी स्टँड परिसर, मुख्य बाजारपेठ आणि देवरुख रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पहिली कारवाई सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर ते देवरुख मार्गावरील मालप इलेक्ट्रिकल दुकानासमोर करण्यात आली. सांगली येथील चालक प्रकाश पांडुरंग गुरव याने आपला टेम्पो रस्त्यात उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश जयकर पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​ही कारवाई सुरू असतानाच, अवघ्या काही वेळातच म्हणजेच सायंकाळी ६:२५ वाजता संगमेश्वर एस.टी. स्टँड ते बाजारपेठ या गर्दीच्या रस्त्यावरील संगम स्वीट मार्टसमोर दुसरी कारवाई करण्यात आली. लांजा येथील चालक सतिश सदाशिव जाधव याने आपली ओम्नी गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी केली होती. यामुळे लोकांच्या व वाहनांच्या दळणवळणास अडथळा निर्माण झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल शंकर गोपाळ चव्हाण यांनी त्याच्यावरही भारतीय न्यायसंहिता कलम २८५ नुसार गुन्हा नोंदवला.

टाईम्स स्पेशल

या धडक कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी रस्ते मोकळे ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, नियम मोडणाऱ्यांना आता थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांच्या या अचानक सुरू झालेल्या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे, तर दुसरीकडे रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या निर्णयाबद्दल पोलिसांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg