loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान : मुरुड तालुक्यात काशिद व साळाव ग्रामपंचायत अव्वल

कोर्लई (राजीव नेवासेकर) - राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत दि.३० मे रोजी मुरुड तालुक्यातील काशिद व साळाव ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरीय मूल्यमापन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी जिल्हा परिषद पुणे येथील मान्यवर समितीने मुरुड तालुक्यातील काशीद व साळाव ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मूल्यमापन समितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भूषण जोशी, मुळशी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुमित शिंदे, पंचायत समिती खेडचे विस्तार अधिकारी तुषार साळुंके तसेच मनरेगाचे ए.पी.ओ. साईराज प्रधान यांचा समावेश होता. ‌या समितीने ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी करून ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg