loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत २ जूनला दृष्टिबाधितांसाठी ‘गोलबॉल’ क्रीडा प्रशिक्षण शिबिर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : दृष्टिबाधित (अंध व अंशतः अंध) बांधवांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सावंतवाडीत ‘गोलबॉल’ क्रीडा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ​‘गोलबॉल’ हा दृष्टिबाधित खेळाडूंसाठी विशेषत्वाने विकसित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार असून, यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती, राष्ट्रपती तथा संविधान योद्धा पुरस्कार सन्मानित, आंतरराष्ट्रीय गोलबॉल खेळाडू व प्रशिक्षक नेहाताई पावसकर उपस्थित राहणार आहेत. ते उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे शिबिर मंगळवार, दिनांक २ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता या वेळेत सावंतवाडी येथील समाजमंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये होणार आहे. ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दृष्टिबाधित बांधव, विद्यार्थी, पालक व इच्छुक खेळाडूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहस प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी रुपाली पाटील (९०४९२७१७४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg