loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नुगरपंचायतची प्लास्टिक विरोधात धडक मोहिम, हजारो रूपयांचा दंड वसुल

केळंबे (लांजा), (सिराज नेवरेकर) - नगरपंचायतीने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक मोहीम राबवत शहरातील विविध व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवार २ जून रोजी लांजाच्या आठवडा बाजारात नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्त्यावरील विक्रेते, भाजीपाला मंडई, फुल विक्रेते तसेच हॉटेल व्यवसायिकांची तपासणी केली. या तपासणीत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेत नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक सुरज जाधव, शहर समन्वयक रोहित कराळे, वरिष्ठ लिपिक प्रज्ञा जेधे, प्रमोद जाधव, लिपिक संजय गुरव, संतोष आग्रे, व्हॉलमन रंजना खेडेकर, डाटा ऑपरेटर युवराज मांडवकर, विनीत आंबेकर, शिल्पा लांजेकर, मुकादम रविंद्र कांबळे, शिपाई राजकुमार कुंभार तसेच सफाई कर्मचारी राजेश कुंभार, बाबल्या पवार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg