loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवराज्यभिषेक सोहळा सावंतवाडी पंचायत समितीमध्ये उत्साहात साजरा

सावंतवाडी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पंचायत समितीमध्ये 'शिवराज्यभिषेक सोहळा' अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण पंचायत समिती परिसर फुलांच्या माळांनी सजवला गेला होता. सकाळी ठिक ९:०० वाजता पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशव्दारावर स्वराज्यांची गुढी उभारून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावंतवाडी सभापती सुष्मिता जाधव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पुजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सदरच्या कार्यक्रमांस गटविकास अधिकारी निलेश जाधव, उपअभियंता बांधकाम अंगद शेळके, उप अभियंता लघु पाटबंधारे मंदार जुवेकर, सहायक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील व जितेंद्र सावंत तसेच सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी / कर्मचारी यांनी पारंपरिक पोषाख परिधान केला होता, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. "शिवरायांचे विचार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही आपल्याला प्रशासकीय काम करताना मार्गदर्शक ठरतात," असे प्रतिपादन सभापती जाधव यांनी या प्रसंगी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg