loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे दुबळेवाडीत विदयुत खांबाला लाकडी बांबूचा आधार

दापोली (प्रतिनिधी) : विदयुत महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा त्रास हा विदयुत ग्राहकांना सोसावा लागतोच शिवाय रहिवाशांनाही नाहक सहन करावा लागतो आहे. दापोली येथील विदयुत महावितरण कंपनीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. वारंवार विदयुत पुरवठा खंडित होणे ही बाब नित्याचीच झाली आहे मात्र अनेक ठिकाणचे लोखंडी विदयुत पोल जमिनीच्या बाजूने गंजले आहेत. अनेक ठिकाणी विदयुत वाहीन्या खाली लोंबकळत आहेत तर काही ठिकाणी विद्युत वाहीन्या या आंबा काजू च्या फळ बागेतून वा झाडांच्या विस्तारातून गेलेल्या असलेल्या त्याचा धोका जागा मालकांना होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशाच प्रकारचा विदयुत पोल गिम्हवणे दुबळे वाडी येथील रामचंद्र दुबळे यांच्या सिकंदर निवास घराच्या आवारात असलेला आणि जमिनीकडील भागाकडील भाग पुर्ण गंजून गेलेला आहे. त्यामुळे पोलवर विदयुत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलवर चढणे धोक्याचे झाले. सध्या या पोलला लाकडी बांबूचा आधार देऊन टेकू देण्यात आला आहे. मात्र हा पोल पावसाळ्यात, पावसाळी वादळी वाऱ्यात कधीही खाली कोसळून आडवा पडण्याची शक्यता आहे. येथील या धोकादायक पोल संदर्भात लेखी निवेदन दिलेले आहे. प्रत्येक भेटीदरम्यान सांगितले गेले आहे. यात्र ढिम्मदयुत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अधिक धोका आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg