loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे रविवारी १४ जून रोजी रक्तदान शिबीर

सावंतवाडी: १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन आहे. त्यानिमित्त कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य आहेच, परंतु सर्वच रक्तपेढयाप्रमाणे सध्या जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सुद्धा रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रक्तदान शिबीर श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा, सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा यांच्या सहकार्याने येत्या रविवारी दि. १४ जून रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद गवस (९८२१४४४१७०), ीअलहर्ळीं स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (९७६३७१७७९०), अक्षय मयेकर (९५०३८७१९२४), सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (९७६७५७७७७४), ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (९४२२३७९३४६) आणि समीर परब (९८२३८३०११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg