loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील बंद पर्यटन केंद्रावर चोरांचा डल्ला; दोघे रंगेहात जेरबंद

सावंतवाडी - गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या येथील पर्यटन सुविधा केंद्रावर आता चोरांचा डोळा पडला आहे. सद्यस्थितीत मोकाट गुरांचा अड्डा बनलेल्या या केंद्रातील महागड्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे दोन चोरांना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या ‘एसी कॉम्प्रेसर’ घेऊन जाणार्‍या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश केशव नाईक (वय ३१, राहणार - माणगाव कालेली) आणि सोहम मुकुंद पिळणकर (वय १९, राहणार - सालईवाडा, सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही कारवाई पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास येथील ‘तीन मुशी’ परिसरामध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कोरगावकर आणि सुरेश पाटील यांनी केली. त्यांना एका वाहनाची हालचाल संशयास्पद वाटली. वेळ न घालवता पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखवत सदर वाहन थांबवले आणि त्यांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी थांबवलेल्या वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये एक महागडा ’एसी कॉम्प्रेसर’ आढळून आला. गस्तीवरील पोलीस कर्मचार्‍यांनी वाहनातील उमेश नाईक आणि सोहम पिळणकर या तरुणांकडे या महागड्या मालाबाबत आणि तो कुठे घेऊन जात आहेत, याविषयी चौकशी केली.

टाईम्स स्पेशल

मात्र, या दोन्ही तरुणांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही, तसेच पर्यटन सुविधा केंद्रातून काढलेल्या या मालाबाबतची कोणतीही वैध कागदपत्रे त्यांना सादर करता आली नाहीत. हा माल चोरीचा असल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत माल जप्त केला आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील हे करत असून, हा माल त्यांनी नेमका कुठून चोरला आणि तो कुठे घेऊन चालले होते, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत. भर पहाटेच्या वेळी कर्तव्यदक्षता आणि सतर्कता दाखवून ही मोठी कारवाई करणार्‍या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg