संगलट (खेड) (प्रतिनिधी) - दापोली-खेड मार्गावर 3 जून रोजी पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास वॅगनआर कारचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४६-सीएच-६०५६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची वॅगनआर कार खेडहून दापोलीकडे येत होती. टाळसुरे पोस्ट हद्दीतील खोतवाडी ग्रामपंचायत परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गाडीतील सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक कार्यवाही केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहनचालकांनी विशेषतः पहाटेच्या वेळी आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर वाहन चालविताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.