loader
Breaking News
Breaking News
Foto

आवाशी महामार्गलगत भंगार गोडाऊनला भीषण आग

गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील आवाशी येथे मुंबई गोवा महामार्गजवळ असलेल्या एका भंगार गोडाऊनला गुरुवार दि. ४ रोजी सकाळी 10 च्या दरम्यान भीषण आग लागून भंगार चे सामान जाळून खाक झाले. सदरची आग विझवणे करिता अग्निशमन दलाच्या तीन बंबानी सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मुंबई गोवा महामार्गावर आवाशी येथील हॉटेल अन्नपूर्णा जवळच्या मोकळ्या जागेत एका भंगार व्यवसायिकाचा भंगारचा प्रचंड साठा होता. यामध्ये प्ल्यास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे ड्रम, कारखान्यांमध्ये वापरलेले रिकामे ड्रम, लोखंड, इत्यादी प्रकारचे भंगार होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आग लागल्यावर आगीचे लोळ आकाशात उडू लागले. आग आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत घबराट पसरली. आगीचे वृत्त समजताच घरडा केमिकल्सचा आगीचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्याचबरोबर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब सुद्धा घटनास्थळावर दाखल झाले व आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यातच आवाशीमधील स्थानिक तरुण विराज आंब्रे, मंगेश मोरे, बंटी आंब्रे,एस. के. आंब्रे, जीवन आंब्रे, नाना आंब्रे, भास्कर आंब्रे, अमोल आंब्रे, भाऊ मोरे यांच्यासह अनेक तरुणांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीची मदत केली.

टाईम्स स्पेशल

या सर्वांच्या सामुदायिक आणि अथक प्रयत्नानंतर सुमारे 2 तासांनी आग आटोक्यात आली. यावेळी लोटे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व शिपाई घटनास्थळावर हजर झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg