loader
Breaking News
Breaking News
Foto

विल्ये बौद्धजन विकास कमिटी यांच्या वतीने देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती व माता रमाई यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी अवयवदान व देहदान बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी विल्ये बौद्धजन विकास कमिटी यांच्या वतीने अशा प्रकारचे सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक रेशम विजय जाधव यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रेशम जाधव यांनी देहदान व अवयवदान बाबत सविस्तर माहिती दिली आणि देहदान, नेत्रदान माहितीपत्रक वाटप केले तसेच देहदान, अवयवदान करावयाचे असल्यास केली जाणारी प्रकिया सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच देहदान व अवयवदान बाबत उपस्थित लोकांना संकल्पपत्र भरण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाची विशेब बाब अशी की, मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी मधील सदस्य - आयु. छाया सिताराम कांबळे व आयु. सिताराम भागा कांबळे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देहावर अभ्यास करता यावा व कुशल डॉक्टर तयार व्हावे या उद्देशाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे देहदान संकल्पपत्र भरले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg