देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सकल हिंदूधर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन कोंडगाव येथील कबनुरकर हॉलमध्ये पार पडले. या संमेलनाचे प्रशांत कदम हे प्रमुख वक्ते होते. हिंदूधर्म हा इतर धर्मांच्या अगोदरचा धर्म असून सोन्याची लंका जाळण्याची ताकद हिंदू धर्मामध्ये असल्याचे प्रमुख वक्ते प्रशांत कदम यांनी सांगितले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू संस्कृतीचे महत्त्व, परंपरा जपण्याची गरज तसेच समाजाने एकत्र येऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.
तसेच संमेलनामध्ये समाजप्रबोधन, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक एकता यावर विशेष भर देण्यात आला. या संमेलनात मोठ्या संख्येने हिंदू बंधु व भगिनी उपस्थित होत्या. यावेळी खडीओझरे, खडी कोळवण, निनावे, किरबेट, भोवडे, देवडे, भडकंबा, मुर्शी, तिवरेमेढे, कोंडगाव, साखरपा या गावातील हिंदु बांधव उपस्थित होते. प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साखरपा पंचक्रोशीतील हिंदु बांधवांनी याचे आयोजन केले होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.